महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून घेणार शपथ

Newslive मराठी- येत्या 30 तारखेला नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

यावेळी शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून शपथ घेणार असल्याची माहिती कल्याणचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

निवडून आल्यानंतर त्यांनी प्रथमच डोंबिवलीत मतदारांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, सोशल मीडियावर #मराठीतशपथ हा ट्रेण्ड सुरू आहे.

शिवसेना ही मराठी अस्मितेवर चालणारी संघटना असून शिवसेनेने नेहमीच मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी लढा दिला आहे असं यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *