महाराष्ट्रराजकारणलक्षवेधी

राज्यातील सर्वच खासदार कोट्यधीश!

Newslive मराठी-  महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेले सर्व 48 खासदार करोडपती असून त्यांची सरासरी मालमत्ता रुपये 23.04 कोटी आहे.

48 खासदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 खासदारांकडे सर्वाधिक सरासरी 89.41 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. भाजपच्या 23 खासदारांकडे सरासरी 21.11 कोटींची मालमत्ता आहे.

शिवसेनेच्या 18 खासदारांकडे सरासरी मालमत्ता 12.97 कोटी आहे. काँग्रेसच्या बाळू धानोरकरांकडे 13.74 कोटींची संपत्ती आहे.

दरम्यान,  राज्यातील ४८ पैकी २८ (५८%) विजेते उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे. १५ जणांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि धमकावणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पक्षनिहाय विचार केला तर भाजपच्या १३, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आणि काँग्रेस या पक्षाच्या प्रत्येकी एका खासदारावर गुन्हा दाखल आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi