महाराष्ट्रराजकारण

युतीची चर्चा गेली खड्ड्यात; आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा- उद्धव ठाकरे

Newslive मराठी-  या वर्षीचा दुष्काळ गंभीर आहे, पण शिवसेना खंबीर आहे. सरकारी यंत्रणेच्या सुस्त पडलेल्या अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय. युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बीडच्या सभेत केली.

दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ दिसायलाही यांना यंत्रणा लागते. बीडमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर तुमच्या रेशनमध्ये कपात झाली, हे खरं आहे की खोटं? दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येऊन गेलं, मात्र तुमच्या हातात काही मदत पडली का? पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

  जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो, असंही त्यांनी सांगितलं. खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत  असे ठाकरेंनी यावेळी सांगितले.