महाराष्ट्र

भाजपाशी युती केवळ निवडणुकीपुरती आहे- रामदास आठवले

टिम Newslive मराठी: भाजपाशी युती केवळ निवडणुकीपुरती आहे. युती असली, तरी भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशी आमचा संबंध नाही. माझा झेंडा निळा आहे. तो मी कधीही सोडणार नाही, असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

समाजातील प्राध्यापक, साहित्यिक यांच्यासोबत पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी बैठका घेऊनच भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यापुढेही सर्वांना विचारात घेऊ नच निर्णय घेतला जाईल,’ असे सांगताना ‘माझ्या हातात आहे झेंडा निळा, त्यामुळे अनेकांच्या पोटात उठला आहे गोळा,’ अशी कविताही त्यांनी केली.

संविधान तयार झाल्यावर अन्याय-अत्याचार कमी झाले. संविधान बदलण्याचा कुणी प्रयत्न केला, तर त्यांचे हात तोडण्याचे काम आम्ही करू, असा इशारा आठवले यांनी या वेळी दिला. नदीजोड प्रकल्पाचे खरे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे साहित्यिकही होते. साहित्याचा वारसा त्यांनी खऱ्या अर्थाने जपला. त्यामुळे साहित्यिकांचा मी आदर करतो. साहित्यिक माझा आदर करतात की नाही, ते मला ठाऊक नाही, असेही आठवले म्हणाले.