महाराष्ट्रराजकारण

अमित शहांची तब्येत पुन्हा बिघडली, रात्री एम्समध्ये दाखल

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना बर्‍याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. त्यांना कोरोना सुद्धा झाला होता. अशा परिस्थितीत अमित शहा यांना पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, उपचारानंतर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर अमित शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

आता पुन्हा श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे अमित शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री ११ वाजता अमित शहा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर अमित शहा यांना श्वास घेताना त्रास जाणवत आहे. शहा यांनी काही काळ रुग्णालयात राहावे. रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली चांगले उपचार होतील, असे एम्समधील एका सूत्राने सांगितले.

अमित शाह यांना एम्समधील कार्डियो न्यूरो टॉवरमध्ये दाखल करण्यात आले आहे. याआधी शहा यांना १८ ऑगस्टला नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली अमित शहा यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची तब्येत सध्या स्थीर आहे.