महाराष्ट्रराजकारण

कंगनाची बाजू घेत अमृता फडणवीस उतरल्या मैदानात

सध्या कंगना रणावत चांगलीच अडचणीत आली आहे. कंगना राणावतने मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्यावरुन शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. एकीकडे भाजपचे काही नेते कंगनाचं समर्थन करत आहेत, तर शिवसेनेचे नेते कंगनावर सडेतोड टीका करत आहेत.

याचाच धागा पकडत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला एखाद्याचं म्हणणं पटू शकत नाही, पण लोकशाहीत व्यक्त होण्याचा आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे,’ असे त्या म्हणाल्या.

याबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘वाद-प्रतिवाद होत रहावेत, पण पोस्टरला चपलांनी मारण हे पातळी घसरल्याचं लक्षण आहे. यावरून आता मुंबई पोलिसांबरोबर सगळे एकवटले आहेत. कंगना आता एकटी पडल्याचे दिसत आहे.