आंतरराष्ट्रीयदेश-विदेश

देशात कोरोना रुग्णसंख्येत चिंतेत भर टाकणारी वाढ; आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडित

Newslive मराठी-  कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आतापर्यंतचे सर्व आकडेवारी मोडीत काढली आहे. मागील 24 तासात देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. देशात मागील 24 तासात 55 हजार 79 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढलेल्या संख्येमुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाखांच्या पुढे गेली आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 38 हजार 871 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत दहा लाख 57 हजार 806 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर पाच लाख 45 हजार 318 जणांवर उपचार सुरु आहेत. चिंताजनक म्हणजे गेल्या 24 तासात 779 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एकूण कोरोनाबळी 35 हजार 747 झाले आहेत.

दिल्लीमध्ये 3907, तमिळनाडूमध्ये 3741, गुजरातमध्ये 2147, उत्तर प्रदेशमध्ये 1530, पश्चिम बंगालमध्ये 1490, आंध्र प्रदेशमध्ये 1213, मध्य प्रदेशमध्ये 843 जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. मरण पावलेल्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक लोकांना एकाहून जास्त व्याधी होत्या. करोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर 2.23 टक्के इतका असून जागतिक स्तरावरील मृत्यूदरापेक्षा तो कमी आहे. 19 जून रोजी देशातील मृत्यूदर 3.3 टक्के होता. देशात सर्वाधिक मृत्यू आणि करोनाबाधित महाराष्ट्रात जास्त आहे. राज्यात मुंबई आणि पुण्याची परिस्थिती चिंताजनक आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 70 लाखांवर

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi