आंतरराष्ट्रीयआरोग्यकोरोना

भारतात लस वितरण ठरवण्यासाठी उद्या महत्त्वाची बैठक

Newsliveमराठी -लस खरेदी, प्राधान्यक्रम आणि वितरण या संबंधी निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती बनवण्यात आली आहे. निती आयोगाचे डॉ. व्ही.के.पॉल यांच्या अध्यक्षतेखाली या तज्ज्ञ समितीची उद्या बुधवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. सध्याच्या घडीला लस हाच करोना व्हायरसच्या संकटातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. जगातील तीन ते चार लसी मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचल्या आहेत. सर्व काही सुरळीत झाले तर सप्टेंबरपासून लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते.

त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे लसीकरण कसे करायचे? त्याचा आराखडा निश्चित करण्यासंदर्भात बुधवारी टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक होणार आहे. भारतात २२ लाखापेक्षा जास्त लोकांना करोनाची बाधा झाली असून आतापर्यंत ४४ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही समिती राज्य सरकार आणि लस उत्पादकांबरोबरही चर्चा करेल असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.