बातमीमहाराष्ट्र

होलार समाजाच्या वतीने शिखर शिंगणापूर येथे अन्नदानाचा कार्यक्रम

( सुरज देवकाते) 

Newslive मराठी-   बारामती होलार समाजाच्या (सेवाभावी संस्थेच्या) वतीने सालाबाद प्रमाणे दि.16 रोजी शिखर शिंगणापूर येथे कावडीतील सर्व शिवभक्तांसाठी अन्नदान व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

होलार समाज सामाजिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असतो. आणि ही अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन करून समाजाने परंपरा कायम राखली आहे. कार्यक्रमाचे हे 41 वे वर्ष असून, यावेळी अन्नदान व महाप्रसादाचा लाभ हजारो शिवभक्तांनी घेतला.

दरम्यान, शिखर शिंगणापूर भंडाऱ्याचे अध्यक्ष निवृत्ती गोरे, उपाध्यक्ष सनी आवटे, बाळासाहेब देवकाते, बळवंत माने, बाळासाहेब जाधव, सदाशिव गुळवे, सेवक अहिवळे, मिथुन चौगुले, पत्रकार सुरज देवकाते, हिरामण माने,सचिन अहिवळे, सदाशिव गुळवे, रोहिदास गोरे,भारत देवकाते,अजय माने तसेच होलार समाजाचे युवा कार्यकर्ते व जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदींच्या सभेचा आम्हाला फायदाच होतो- शरद पवार

राजकारणातून पवारांना संपवणार- चंद्रकांत पाटील

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

Newsliveमराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi