महाराष्ट्रराजकारण

तुकाराम मुंढे बदली प्रकरणी नागपुरात नितीन गडकरी यांच्या विरोधात घोषणा

नागपूरमध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या विरोधात राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या आणि भाजपाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. संविधान चौकातील आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आपच्या कार्यकत्यांनी ‘होश मे आओ, होश मे आओ नितीन गडकरी होश मे आओ’ अशा घोषणा दिल्या आहेत.

मुंढे यांच्यामुळे आपले परिवार कोरोनाकाळात सुरक्षित आहेत, त्यांनी भ्रष्टाचाराला थारा दिला नाही, अशी फलके यावेळी झळकावण्यात आली आहे.’शिस्तप्रिय अशी ओळख असण्याबरोबरच आपल्या कार्यशैलीने सर्वसामान्य जनतेचा भक्कम पाठिंबा मिळवण्यात यशस्वी ठरलेले तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरूनची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आल्याने जनमानसात चांगलीच खळबळ उडाली.

नितीन गडकरी आणि त्यांच्यात वाद झाले होते यावरून गडकरी यांनी त्यांची तक्रार केली होती. पालिकेत भाजची सत्ता असून तेथे मुंढे यांना त्यांच्या पध्दतीने काम करू दिले जात नव्हते. यावरून हा वाद सुरू झाला होता.