महाराष्ट्र

साडेसहा हजार कोटींची घोषणा पण साडेसहा रुपये देखील मिळाले नाहीत- अजित पवार

Newslive मराठी-  कल्याण डोंबिवली शहराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडे सहा हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं मात्र त्यातील साडे सहा रुपयेदेखील मिळालेले नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्वीटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका कामगार आणि शेतकरीविरोधी आहे, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. ते डोंबिवलीत माथाडी कामगारांच्या कार्यक्रमात बोलत होते.

माथाडी कामगारांचं आणि शरद पवार यांच घनिष्ठ नातं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.