महाराष्ट्रराजकारण

गोपीचंद पडळकर यांना भाजपकडून अजून एक मोठे पद!

लोकसभेत विरोधात प्रचार करणारे मात्र ऐन विधानसभेवेळी भाजपात येऊन थेट बारामतीमध्ये अजित पवारांना आव्हान देणाऱ्या गोपीचंद पडळकरांना देखील मोठी जबाबदारी दिली आहे. याआधी देखील, गोपीचंद पडळकर यांना असलेला धनगर समाजाचा पाठिंबा बघता विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली आहे.

गोपीचंद पडळकरांची पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच, लोकसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या माजी खासदार धनंजय महाडीक यांची देखील पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे पडळकरांचे आता पक्षात वजन वाढले आहे. गेल्या लोकसभेला त्यांनी भाजप विरोधात जोरदार रान पेटवले होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये थेट अजित पवारांना बारामतीमध्येच आव्हान दिले होते. त्यानंतर, फडणवीसांच्या या ढाण्या वाघाचे डिपॉजिट देखील जप्त झाले होते.

यानंतर गोपीचंद पडळकरांचे राजकीय भवितव्य संपणार अशी चर्चा असतानाच भाजपने त्यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली. आणि आता अजून एक मोठे पद देखील दिले आहे.