मनोरंजनमहाराष्ट्र

कोरोनाची लस सापडत नसल्याने अनुपम खेर यांना अश्रू अनावर

Newslive मराठी-  कोरोना विषाणू संपूर्ण जगात थैमान घालत आहे. जगभरातील लाखो लोकांना या विषाणूची लागण होत आहे. कोरोनामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. लाखो लोक बेरोजगार झालेत.

अशा या संकटकालीन परिस्थितीवर अभिनेते अनुपम खेर यांनी चारोळीच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. त्यांचा हा काव्यात्मक अंदाज सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

रहिमन वैक्सीन ढूंढिए, बिन वैक्सीन सब सून ;वैक्सीन बिन हीं बीत गए, एप्रिल मई और जूनअशा प्रकारे संत कबिर यांच्या अंदाजात लिहिलेली चारोळी अनुपम खेर यांनी ट्विट केली आहे.

लसी शिवाय तीन महिने गेले. मात्र अद्याप करोनावर मात करणारी लस सापडलेली नाही. लवकरात लवकर लस शोधून काढा. अन्यथा आपलं काही खरं नाही. असा या चारोळीचा अर्थ आहे. अनुपम खेर यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. जगभरात कोरोनावरती लस संशोधन चालू आहे. लवकरच आपल्याला लसीसंबंधीची गोड बातमी मिळू शकते

महत्वाच्या बातम्या- 

-ऐश्वर्या-आराध्या कोरोनामुक्त; बिग बींना आनंदाश्रू झाले अनावर