कोरोनादेश-विदेश

दिल्लीमध्ये हॉटेल, बाजार उघडण्यास मंजुरी पण जिम बंद राहणार

Newsliveमराठी – करोना आणि लॉकडाउनच्या काळात हॉटेल्स, जिम, शाळा सगळं काही बंद करण्यात आलं होत. मात्र आता इतक्या महिन्यांनी दिल्लीत हॉटेल्स उघडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसंच आठवड्याच्या बाजार उघडण्यास प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी देण्यात आली आहे. जिम मात्र बंद राहणार आहेत. आम आदमी पार्टीचं सरकार दिल्लीत आहे. देशात अनलॉक ३ सुरु झालं आहे. अशात दिल्लीत हॉटेल्स,जिम आणि बाजार उघडण्यात यावेत अशी मागणी होत होती. मात्र तूर्तास जिम बंदच ठेवण्यात आले आहेत. जिम, हॉटेल्स आणि बाजार उघडण्यासाठी उपराज्यपालांना शिफारस करणारं पत्रही पाठवण्यात आलं होतं. ज्यानंतर जिम वगळता साप्ताहिक बाजार आणि हॉटेल्स उघडण्यास संमती देण्यात आली आहे.

सुरुवातीला शिफारस करण्यात आली तेव्हा ती फेटाळण्यात आली. कारण आठवडा बाजार आणि हॉटेल्स सुरु केल्याने करोनाचं संक्रमण वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. मात्र आता दिल्लीमध्ये हॉटेल्स आणि आठवड्याचे बाजार उघडण्यास संमती देण्यात आली आहे. बुधवारी हा निर्णय घेण्यात आल्याने आता हॉटेल इंडस्ट्रीत काम करणाऱ्या सुमारे चार लाख लोकांना फायदा होऊ शकतो. जिम आणि योगा क्लासेस उघडण्यास संमती देण्यात आलेली नाही. याबाबत कदाचित पुढच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो.