मनोरंजनमहाराष्ट्र

आर्चीचा साडीमधील फोटो ठरतोय अगदी चर्चेचा विषय!

चार वर्षांपूर्वी नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ सिनेमा प्रसिद्ध झाला आणि आर्ची थेट नावाजलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत जाऊन बसली. त्यामुळे तिचे चाहते देखील मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. सोशल मीडियावर देखील सध्या आर्ची खूप अँक्टिव्ह आहे. रविवारी तिने मराठमोळ्या लूकमधील एक फोटो फेसबुकवर टाकला आहे. त्याला तिच्या चाहत्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आहे. ती इंस्टाग्रामवर देखील आहे.

सोशल मीडियावर आर्ची सतत आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. त्यातूनच तिने आपल्या फेसबुक वॉलवर एक साडी परिधान केलेला सुंदर फोटो शेअर केला आहे. सहा तासात तिला हजारो लाईक आल्या आहेत. कमेंट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आल्या असून अनेकांनी तो फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचे काही नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आता मराठमोळ साडीतला तिने फोटो शेअर केला आहे. अनेकांनी या फोटोवर तिचे कौतुक केले आहे. अगदी पहिल्याच चित्रपटात तिने देशभरात नाव कमवले आहे.