आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

नीरव मोदी यांच्या पत्नीविरोधात अटक वॉरंट!

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी हिच्या विरोधात इंडिटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस म्हणजे आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट म्हणून ओळखले जाते. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची आणि त्याच्या कुटुंबियांची मनी लॉडंरिगच्या संशयाने तपास सुरू आहे.

याच प्रकरणी मिसेस मोदी विरोधात नोटीस बजावण्याची विनंती ईडीने इंटरपोलला केली होती. त्यानुसार आज इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. जानेवारी २०१८ मध्ये नीरव आणि मोदी भारतातून पळून गेले होते. त्यानंतर नीरवला गेल्या वर्षी लंडनमध्ये अटक झाली.

भारतातून अनेक उद्योगपती अनेक कोटींचे कर्ज घेऊन फरार झाले आहेत. यामध्ये विजय मल्ल्याचा देखील समावेश आहे. लवकरात लवकर यांना अटक करण्यात यावी अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.