महाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकी देणाऱ्यास अटक! एटीएसच्या पथकाची कारवाई

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शरद पवार आणि अनिल देशमुख यांना धमकीचे फोन येत आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमक्यांचे फोन कॉल्स केल्याचा आरोप असलेल्या पलाश बोस याला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी कोलकात्यात अटक केली. बोसने असेच कॉल्स गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी केले होते, असे दहशतवादविरोधी पथकाने एटीएसने शनिवारी सांगितले.

बोस १५ पेक्षा जास्त वर्षे दुबईत राहून काही वर्षांपूर्वी कोलकात्याला परतला. तो अभिनेत्री कंगना रणावतचा चाहता आहे, असे अधिका-याने सांगितले. बोसने फोन करताना आपण दाऊद इब्राहीम टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला होता.

त्याने धमक्यांचे फोन दुबईतून मिळविलेल्या सिम कार्डवरून केले होते. त्याचे दुबईत काही संबंध आहेत का, हे तपासले जात आहे. त्याच्यावर खा. संजय राऊत यांनाही या महिन्यात गंभीर परिणाम होतील, अशा धमक्या देणारे फोनसाठी इंटरनेट कॉलिंग सर्व्हिसेसचा वापर केल्याचा आरोप आहे. या धमकीच्या फोनवरून राज्यात एकच खळबळ उडाली होती. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.