आंतरराष्ट्रीयमनोरंजन

डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत; सपना चौधरीचं बाॅलिवूड पदार्पण

Newslive मराठी- आपल्या अदाकारिने प्रसिद्ध असलेली हरियाणाची गायक आणि नर्तिका सपना चौधरी आता बाॅलिवूड मध्ये पदार्पण करत आहे. सपनाची मुख्य भूमिका असलेल्या ‘दोस्ती के साईड इफेक्ट्स’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे.

या चित्रपटात सपना डॅशिंग आयपीएस आधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या ८ फेब्रुवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हैद अली अबरार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंं आहे.

दरम्यान, सपना चौधरी सोबत विक्रांत आनंद, जुबेर खान, अंज्जु जाधव आणि साई बल्लाळ प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा बालपणीच्या चार मित्र- मैत्रिणीं भोवती फिरते.

@Newslivemarathi