देश-विदेशराजकारण

“राम मंदिर बनताच करोना देशातून पळून जाईल”; भाजपाच्या महिला खासदाराचा दावा

Newslive मराठी- देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 लाखांपेक्षा जास्त आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांकडून कोरोनाविषयी आश्चर्य चकित करणारी विधानं केली जात आहे. भाजपच्या एका महिला खासदारानं राम मंदिर आणि कोरोनाविषयी एक वक्तव्य केलं आहे. “राम मंदिर बनताच करोना देशातून हद्दपार होईल,” खासदार जसकौर मीना यांनी म्हटलं आहे

अयोध्योत राम मंदिराच्या बांधकामालालवकरच सुरूवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या भूमिपूजन होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी हा  भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमासाठी मोजक्याच व्यक्तींना निमंत्रण दिलं जाणार आहे.

पायाभरणीच्या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असतानाच भाजपाच्या महिला खासदार जसकौर मीना यांनी कोरोनाबद्दल आश्चर्यकारक विधानं केलं आहे. दौसा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या मीना या विधानामुळे चर्चेत आल्या आहेत.”आम्ही आध्यात्मिक शक्तीचे पुजारी आहोत. आध्यात्मिक शक्तीप्रमाणेच चालतो. मंदिर तयार होताच करोना देशातून पळून जाईल,” असं जसकौर मीना यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-मुख्यमंत्री राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी हरकत नाही- शरद पवार

-व्याघ्र दिन एका दिवसापुरता मर्यादीत राहता कमा नये– मुख्यमंत्री

-“त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं”,चंद्रकांत पाटलांना टोला