बातमी

ऍम्ब्युलन्स वेळेत मिळत नसल्यामुळे पुणे महापालिकेच्या उपायुक्तांची मोटार फोडली

कोरोनामुळे निधन झाल्यानंतर पार्थिवावर दोन किमी अंतरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला नेण्यासाठी केवळ ऍम्ब्युलन्स मिळण्यात तीन तास आणि स्मशानभूमीत दोन तास वाट पाहावी लागली. यावर कात्रज येथील नगरसेवक आणि मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी महापालिकेच्या उपायुक्तांची मोटाराची काच फोडत आपला राग व्यक्‍त केला.

त्याच्या साडूचे कोरोनामुळे निधन झाले. भारती हॉस्पिटल येथून अवघ्या दीड ते दोन किमी अंतरावर असलेल्या कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.

अनेकदा फोन करून देखील त्यांना ऍम्ब्युलन्स मिळत नव्हती. यामुळे त्यांना राग अनावर झाला. ऍम्ब्युलन्स मिळाल्यानंतर देखील त्यांना खूपवेळ थांबावे लागले. यासाठी रात्रीचे 10 वाजले. या सर्व प्रकारामुळे त्यांनी उपायुक्तांच्या गाडीची तोडफोड केली. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.