महाराष्ट्रराजकारण

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड

आज विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाचे उमेदवार भाई गिरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे महाविकास आघाडीचा हा एक मोठा विजय आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांसह सुरू झालेल्या विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवसेनेकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अजित पवारांनी देखील त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मंत्रीपद मिळाले नाही मात्र हे पद मिळाले असेही अजित पवार म्हणाले.