इंदापूरमहाराष्ट्र

इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना निश्चित- अशोक चव्हाण

Newslive मराठी- इंदापूरच्या विधानसभेच्या जागेसाठी आम्ही मार्ग काढू. ती जागा हर्षवर्धन पाटलांनाच मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या, तरी आम्ही दोन्ही निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे एकत्र निवडणुका घेण्यास आमची काहीही अडचण निर्माण होणार नाही. आम्ही त्या निवडणुका हिमतीने लढवून दाखवू, जिंकून दाखवू असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, पुण्याच्या लोकसभेच्या जागेचा अद्याप निर्णय झालेला नाही असंही चव्हाण म्हणाले.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi