कृषीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी छत्रपती सहकारी कारखान्यात आत्मदहनाचा प्रयत्न

राज्यात अनेक साखर कारखान्यांनी उसाची एफआरपी दिली नाही. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहे. आज इंदापूर तालुक्यातील श्री. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने उसाच्या उर्वरित एफआरपीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षाने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहे. अनेक शेतकऱ्यांवरही उपास मारीची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे छत्रपती कारखान्याने शेतकऱ्यांना अजूनही एफआरपी दिली नाही. आज येथे कार्यक्रम असल्याने चेअरमन प्रशांत काटे तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

यावेळी अचानक अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे एकच गोंधळ उडाला. येथील पूजेतील एका महिलेने सदर प्रकार बघितला आणि लगेच या व्यक्तीच्या हातातून पेट्रोलची बाटली घेतली. यामुळे मोठा अनर्थ टळला. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी लगेच या व्यक्तीला बाहेर काढले.

यावेळी या व्यक्तीने चेअरमन पैसे द्या च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी चेअरमन प्रशांत काटे, अमोल पाटील, गोविंद अनारसे, शेतकी विभागाचे सिद्धीराज निंबाळकर तसेच मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते.