महाराष्ट्रराजकारण

मराठा आणि ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस

ओबीसी आणि मराठा समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. फडणवीस म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणला ओबीसी समाजाने पाठिंबा दिला आहे.

भाजपही मराठा आरक्षणासाठी सरकारच्या पाठीशी आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारविरोधात कधीही विरोधी भूमिका घेतली नाही. याउलट सरकारला मदतच केली आहे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरम्यान हाथरस प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध नोंदवला.

अशा घटनांना आळा बसेल याकडे लक्ष दिले पाहिजे असे त्यांनी नमूद केले. दरम्यान विदर्भात पावसाने शेतकरी घाईला आला आहे. मुख्यमंत्री म्हणतात पिकेल ते टिकेल परंतु शेतकऱ्यांच नुकसान झाले आहे त्याचे काय असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. केंद्राने कृषी आमलात आणलेले सुधारीत कृषी कायदे हे शेतक-यांच्या हिताचे आहेत.

मात्र याविरोधात शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. या कायद्यामुळे बाजार समितीत होणारे शेतकऱ्यांचे शोषण थांबणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.