देश-विदेश

अबब! पत्नीला सोडायची किंमत ६९ अब्ज अमेरिकी डाॅलर्स

Newslive मराठी- अॅमेझाॅनचे मालक व जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझाॅस पत्नी मॅकेन्झीला घटस्फोट देणार आहे. हा जगातील सर्वात महागडा ठरणार आहे. कारण घटस्फोटासाठी बेझाॅस यांना त्यांची अर्धी संपत्ती पत्नीला द्यावी लागेल.

एका प्रसिद्ध वृत्तपत्रानुसार जेफ यांचे त्यांच्या मित्राच्या पत्नीशी अफेर सुरु होते त्यामुळेच मॅकेन्झीने जेफला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. ५४ वर्षीय जेस बेझॉस हे सध्या लॉरेन सांचेझच्या (४९) प्रेमात पडले आहेत. लॉरेन ही एका नृत्याच्या कार्यक्रमाची सुत्रसंचालक म्हणून काम करते.

ब्लूबर्गच्या माहितीनुसार जेफ बेझॉस यांच्याकडे एकूण १३७ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. त्यात ८० अब्ज शेअर्सचा वाटा आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राची मालकी सुद्धा बेझॉस यांच्याकडे आहे. या जोडप्याकडे ४ लाख एकरची मालमत्ता आहे. घटस्फोटामुळे बेझॉस यांच्या एकूण संपत्तीमध्ये खूप मोठी घट होऊ शकते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सध्या बेझॉस यांच्याकडे पाहिले जात असले तरी घटस्फोटानंतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलेली असेल.