महाराष्ट्र राजकारण

शेतकरी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पेनचा कणा- पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन कि बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या देशातले शेतकरी हे ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पेनचा कणा आहेत असे वक्तव्य केले आहे. ‘असे म्हणतात की जो जमिनीशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटांचा सामना अत्यंत प्रभावीपणे करु शकतो. आपल्या देशातले शेतकरी हे याचंच उदाहरण आहेत. असेही ते यावेळी […]

महाराष्ट्र राजकारण

एकनाथ खडसेंना भाजपनं पुन्हा डावललं; राष्ट्रीय कार्यकारिणीमध्येही स्थान नाही

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज आहेत. पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याचे ते सतत सांगत आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नव्या टीमची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील नाराज नेत्या पंकजा मुंडे व विनोद तावडे यांची राष्ट्रीय सचिवपदी वर्णी लागली आहे. मात्र, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मात्र […]

महाराष्ट्र राजकारण

आमच्यात मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही- संजय राऊत

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये भेट झाली. त्यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. या भेटीमागचे तर्कवितर्क लावले असतानाच या भेटीमागे काय कारण होते ते समोर आले आहे. संजय राऊत यांनी भेटीमागील कारण स्पष्टपणे सांगितलं आहे. राऊत म्हणाले, काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी […]

आरोग्य महाराष्ट्र

लसीसाठी ८० हजार कोटी आहेत का? पुनावाला यांचा प्रश्न

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. यामुळे कोरोना लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता भारतातील प्रत्येकाला कोरोनाची लस देण्यासाठी सरकारकडे पुढील वर्षभरात ८० हजार कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतील का, असा प्रश्न सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. हा निधी उभारण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर […]

कोरोना महाराष्ट्र

आता मुंबई पूर्णपणे अनलॉक होण्याची शक्यता होणार

कोरोनामुळे पूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूमध्ये देखील वाढ होतं आहे. मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली नसून, चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्यामुळे रुग्णवाढ दिसत असल्याचा दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे. ते याबाबत कॉन्फेडरेशन […]

महाराष्ट्र राजकारण

ठाकरे सरकार एक दिवस स्वत: हून पडेल- देवेंद्र फडणवीस

भाजपला डावलून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र सरकारमध्ये संवाद नाही, महाविकास आघाडी सरकार काही दिवसातच कोसळेल, अशी टीका विरोधक करत आहेत. आमच्या सरकारमध्ये सर्व काही अलबेल आहे. आम्ही उत्तम कारभार करत आहे, असे सत्ताधारी पक्षातील जेष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. अशातच आता पुन्हा माजी मुख्यमंत्री व विरोधी […]

महाराष्ट्र राजकारण

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकारण पेटले आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील माथाडी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार, असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सरकार मराठा समाजासोबत आहे. […]

महाराष्ट्र राजकारण

आता राज्यभरात धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार

मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ राज्यात आता धनगर आरक्षणाचा मुद्दा ही पेटू लागला आहे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरताना दिसू लागला आहे. आज राज्यभरातून धनगर समाज ‘ढोल बजाओ’ आंदोलन करणार आहे. आंदोलनाची जय्यत तयारी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोरील महाद्वार घाटावर पूर्ण झाली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या […]

महाराष्ट्र लक्षवेधी

केंद्र सरकारकडून 240 ई-बस महाराष्ट्राला जाहीर

इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी मोदी सरकारने महाराष्ट्रातील एसटी महामंडळाला आणि नवी मुंबई महापालिकेला प्रत्येकी 100 इलेक्ट्रिक बस आणि मुंबईच्या ‘बेस्ट’ला 40 बस देण्याचे जाहीर केले आहे. फेम’ इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्याअंतर्गत देशात सर्वाधिक ई- बस महाराष्ट्राला मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुण्यातील पीएमपीला केंद्र सरकारने 125 ई बस गेल्या वर्षी जाहीर केल्या आहेत. परंतु, त्यांची निविदा […]

महाराष्ट्र लक्षवेधी

गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे दुःखद निधन

हे वर्ष अनेक दुःखद घटना घेऊन आले आहे. अशातच अजून एक दुःखद घटना घडली आहे. प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या २४ तासांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. ते लाईफ सपोर्टवर होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ५ ऑगस्टलाच एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लागण झाली […]