आंतरराष्ट्रीयलक्षवेधी

ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचणीची परवानगी टाळली; सीरम इन्स्टिट्यूटला मोठा धक्का

Newslive मराठी- सर्व जगात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना लस कधी येणार याची सर्वजण वाट बघत आहेत. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या भारतात सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्याचे निर्णय घेण्याचे तज्ज्ञांच्या समितीने टाळले.

ही परवानगी मिळविण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचा आदेश सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला या समितीने दिला आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ अ‍ॅस्ट्राझेनिसा कंपनीच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत आहे. कमी व मध्यम स्तराचे उत्पन्न असलेल्या देशांसाठी या लसीचे उत्पादन करण्यासाठी अ‍ॅस्ट्राझेनिसाशी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने करार केला आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या भारतात सुरू करण्यासाठी सिरमने सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे तज्ज्ञांच्या समितीने सांगितले. यामुळे या सिरमच्या प्रस्तावात आठ दुरुस्त्या सुचविण्यात आल्या आहेत. या घडामोडींमुळे मानवी चाचण्या सुरू करण्यासाठी सिरमला लगेच परवानगी मिळणे शक्य नाही. या विषयावर सिरमने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.

सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेल्या लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांतील मानवी चाचण्यांसाठी 1600 स्वयंसेवक हवेत, असे सिरम इन्स्टिट्यूटने आपल्या प्रस्तावात म्हटले आहे. त्याबाबत समितीने सिरमकडून आणखी माहिती मागविली आहे. या सर्व गोंधळात लस केव्हा येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 70 लाखांवर

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi