बातमीमहाराष्ट्र

राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते बाबुराव वायकर यांचा जाहीर सत्कार

Newslive मराठी- पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापतीपदी मावळचे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांची नुकतीच निवड झाली आहे.

सभापती पदी निवड झाल्याबद्दल बाबुराव वायकर यांचा आज (गुरुवारी) पंचायत समिती मावळ यांच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, उपसभापती दत्ता शेवाळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, गटनेता साहेबराव कारके, सभापती सुवर्णा कुंभार, जिल्हा परिषद सदस्या अलका धानीवाले, ज्योती शिंदे, शोभा कदम, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी व सर्व अधिकारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवजयंतीचे नियोजन करण्यासंदर्भात मनपाची बैठक संपन्न