कोरोनामहाराष्ट्र

राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोना झाला आहे. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी चाचणी करुन घ्यावी असं ट्विट करत बच्चू कडू यांनी ही माहिती दिली आहे. शुक्रवारीच उर्जा मंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

दोघांनीही यासंदर्भातली माहिती ट्विट करत दिली. तसंच लवकरच आपण कोरोनावर मात करुन लोकांच्या सेवेत हजर होऊ असाही विश्वास व्यक्त केला. इतकंच नाही तर जे चे कुणी संपर्कात आले आहेत त्यांनीही चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही केलं. मागील काही दिवसांपासून राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने लोकांच्या संपर्कात येत होते. अनेक कार्यक्रमांनाही त्यांची उपस्थिती होती.

बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू हे अचलपूरहून अमरावतीच्या दिशेने रवाना झाले आहेत. आता अजून जास्त काळजी घेण्याची गरज आहे.