आंतरराष्ट्रीयतंत्रज्ञानदेश-विदेश

दर्जाहीन चिनी 371 वस्तूंवर बंदीचा बडगा

Newslive मराठी- गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर चीनच्या विरोधातील भावना जोर धरू लागली आहे. तसंच आता भारत सरकारनं चीनला आर्थिकरित्या घेरण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव भारतानं चीनच्या अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा केंद्र सरकार चिनी वस्तूंवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

चीनमधून भारतात आयात करण्यात येणारी खेळणी, स्टील बार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, टेलिकॉम क्षेत्रातील साधन सामग्री, अवजड मशीन, पेपर, रब्बर आर्टिकल्स आणि ग्लाससारख्या 371 वस्तूंना भारतीय मानकांअंतर्गत आणणार आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत हे अनिवार्य करण्याची योजना सरकार तयार करत आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-घरी बसून पेपर द्या, या सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा

-पाच राफेल विमानांचे भारताच्या दिशेने प्रस्थान

-देशभरात 24 तासांत 47 हजार 704 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 654 जणांचा मृत्यू