महाराष्ट्रराजकारण

पुर्वीचे लुटारू होतेच; त्यात यांची भर पडलीय -प्रकाश आंबेडकर

Newslive मराठी-  पुर्वीचे लुटारू होतेच, त्यात यांची भर पडली आहे. या लुटारुंच्या व्यवस्थेला किती दिवस पोसणार? या व्यवस्थेने राज्यातील कष्टकरी, बहुजन समाजाला विकासापासून, हक्कापासून वंचित ठेवले. ही व्यवस्था बदलण्यासठी बहुजन वंचित विकास आघाडी सज्ज झाली आहे. असं वक्तव्य भारिप-बहुजन महासंघाचे अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केलं. ते मिरज येथे बोलत होते.

हे सरकर म्हणजे चोर- लुटारंचे आहे. हिदुत्ववाद्यांना जे आपले पंतप्रधान वाटत होते. तेच आता चीनी अर्थव्यवस्थेला पोषण निर्णय घेत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा करून देशावर संकट आणले आहे. अशावेळी सारे हिंदुत्ववादी कुठे गेले आहेत, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

दरम्यान, केवळ साठ टक्के पैसा सरळमार्गाने परत आला आहे. या नोटबंदीत तब्बल चाळीस टक्क्यांहून अधिक पैसा काळ्याचा पांढरा झाला. तोच पैसा पुढच्या निवडणुकीत ओतला जाईल आणि त्या जीवावर सत्तेचे मनसुबे भाजप बांधत आहे असंही ते यावेळी म्हणाले.