देश-विदेशबातमी

दिग्दर्शक निशिकांत कामत काळाच्या पडद्याआड

Newsliveमराठी – ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. निशिकांत ५० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशिकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झालं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशिकांत कामत यांनी खलनायकाची भूमिका केली.