महाराष्ट्रलाइफस्टाईल

उसाचा रस पिण्याचे फायदे

Newslive मराठी-

  • उसाचा रस : फायदे
    उन्हाळा आला की आपल्या रोजच्या जीवनशैली मध्ये एक नवीन पेय ऍड होते, ते म्हणजे उसाचा रस. उसाचा रस हा प्रत्येकाला खूप आवडतो. उन्हाळ्यामध्ये उसाचा थंडगार रस पिण्याची मजा काही वेगळीच असते. उन्हाळ्याच्या दिवसात आपण अनेकवेळा पाण्याऐवजी उसाच्या रसाला प्राधान्य देतो. उसाचा रस केवळ उन्हापासून आपला बचाव करत नाही तर अनेक आजारांना दूर ठेवण्यासही मदत करतो. उसाच्या रसामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते व भरपूर ऊर्जा ही मिळते.

उसाचा रस कोणत्याही कोल्ड्रिंक्स पेक्षा आरोग्यास चांगलाही मानला जातो.कारण उसाच्या रसात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी पोषक तत्वे असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात व दातांच्या समस्याही कमी होतात. उसाच्या रसाचे असे काही फायदे असले तरी काही लोकांसाठी हा रस नुकसानकारक ठरू शकतो.

  • जाणून घेऊया उसाचा रस पिण्याचे काही तोटे

मोठ्या प्रमाणात कॅलरीज व कार्बोहायड्रेट असल्यामुळे उसाचा रस हा वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर उसाचा रस टाळावा. उसाच्या रसात साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे डायबिटीज सारख्या आजार असणाऱ्या व्यक्तींनी उसाचा रस पिऊ नये. सहसा आपण फ्रिजमध्ये थंड करून उसाचा रस पिणे पसंत करतो. पण हे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. फ्रिजमध्ये ठेवलेला उसाचा रस पिणं टाळावं.उसाच्या रसामध्ये इतर कोणताही रस मिक्स करू नये. बरेच वेळा आपल्याला वेगवेगळे पेय मिक्स करून पिण्याची सवय असते. पण उसाच्या रसाच्या बाबतीत हे टाळावे.

त्यामुळे उसाच्या रसाचे गुणधर्म कमी किंवा बदलू शकतात. जास्त रस पिल्याने आरोग्यास नुकसान होऊ शकते.कावीळ सारख्या आजाराचे रुग्ण जास्त वेळा उसाचा रस पिऊ शकता. काही व्यक्तींची ब्लड शुगर लेव्हल अचानकपणे वाढत असते. अशा व्यक्तींनी उसाच्या रसाचे सेवन करणे टाळावे. कफाचा त्रास असलेल्या व्यक्तींनीही उसाचा रस पिणे टाळावे. यामुळे कफाचा त्रास वाढतो.

  • बर्फ घातलेला रस अजिबातच पिऊ नये
    खास करून जाड/ स्थूल व्यक्तींनी उसाचा रस टाळावा तर इतरांनी कमी प्रमाणात घ्यावा. ताक, लिंबूपाणी, शहाळे, पन्हे, नाचणीची आंबील, कोकम, सोलकढी यासारखी पेये भरपूर प्रमाणात घ्यावीत. या सर्व गोष्टी विचारात घेऊन उन्हाळ्यात आपण, आपल्या आरोग्याची उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकतो.