खेळमहाराष्ट्र

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का; 13 सदस्यांना कोरोनाची लागण

कोरोनामुळे जगातील अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. आता कशीबशी IPL ची स्पर्धा घेण्यात येणार आहे. 13 व्या हंगामाला अवघ्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. कोरोना संकटाच्या काळात खेळाडू, संघ आणि बीसीसीआय देखील विशेष खबरदारी घेत आहे. मात्र आयपीएल सुरू होण्याआधीच महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

सर्व संघ युएईला पोहचले असून, धोनीच्या संघातील 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात एका गोलंदाजाचा देखील समावेश आहे. यासंदर्भात पंजाब केसरीने वृत्त दिले आहे. जे 12 सदस्य कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत, त्यांच्यामध्ये सपोर्ट स्टाफ आणि सोशल मीडिया टीमच्या सदस्यांचा समावेश आहे. सोबतच एका गोलंदाजाला देखील कोरोनाची लागण झाली आहे, मात्र त्याच्या नावाची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही.

यामुळे आता या स्पर्धेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. कोरोनामुळे अनेक मालिका रद्द करण्यात आल्या आयपीएल देखील ठरलेल्या वेळेत होऊ शकली नाही. आता दुबईमध्ये ही स्पर्धा घेण्यात ठरले मात्र कोरोनाचे संकट याठिकाणी देखील आले आहे. आता पुन्हा संपूर्ण संघाची पुन्हा टेस्ट होणार आहे.