महाराष्ट्रराजकारण

मनसेच्या झेंड्यात होणार मोठा बदल ?

Newslive मराठी- शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. त्यातच आता मनसे आपल्या पक्षाचा झेंडा बदलणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आता संपूर्ण झेंडा भगवा करण्यात येणार असून त्यावर राजमुद्राही असेल अशी माहिती मिळत आहे. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे.

यादिवशी मनसेचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या दिवशीच नव्या झेंड्याचं अनावरण होणार असल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi