महाराष्ट्रराजकारण

केंद्राने कंगना रणावतला दिलेल्या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून मोठा वादंग

शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रणावत यांच्यात सध्या जोरदार वाद सुरू आहे. त्यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर कंगना रणावत हिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी कंगनाला सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी तिच्या वडीलांनीही केली होती. या निर्णयाबद्दल कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. एका देशभक्ताचा आवाज आता कोणीही दडपू शकणार नाही. सध्याची स्थिती पाहता मी आता नव्हे तर आणखीन काही दिवसांनी मुंबईला जावे असे शहा मला सुचवू शकले असते, असे ती म्हणाली.

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणाऱ्या कंगना रणावतविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. यानंतर अध्यक्षांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना याचा २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. यामुळे भविष्यात हा वाद अजूनच वाढणार आहे.