देश-विदेशमहाराष्ट्र

कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी तिरुपती देवस्थानचा मोठा निर्णय

श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुपती देवस्थानालाही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. देशातील अन्य मंदिरांप्रमाणे तिरुपती देवस्थानालाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊन होण्याआधी तिरुमाला येथील श्री वेंकटेश्वर मंदिरात भाविकांकडून मोठया प्रमाणावर रोख रक्कम अपर्ण केली जायची. मात्र कोरोनामुळे यामध्ये अडचणी येऊ लागल्या.

आता हे प्रमाण प्रचंड घटले आहे. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनला रोकड टंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिरुमाला तिरुपती देवस्थानाने आता विविध बँकांमध्ये डिपॉझिट करण्यात आलेल्या १२ हजार कोटीपेक्षा जास्त रक्कमेवर दर महिन्याला व्याज घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळी तिरुमाला येथे टीटीडी विश्वस्त मंडळाची बैठक पार पाडली. या बदलामुळे आम्हाला दर महिन्याला व्याज मिळेल, ज्यातून आम्ही कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकतो तसेच मंदिरातील नियमित विधींचाही खर्च भागवता येईल असे टीटीडी बोर्डाचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी सांगितले.