महाराष्ट्रराजकारण

नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी भाजपची डिजिटल मोहीम, दहा लाख व्हिडिओतून देणार शुभेच्छा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे सगळे केंद्रीय मंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि स्थानिक नेते सध्या एक अनोखे असे लक्ष गाठण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. येत्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल दहा लाख लोकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून मोदींचा वाढदिवस साजरा करण्याचा भाजपचा मानस आहे.

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला फक्त आठ दिवस बाकी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचा आयटी सेल कामाला लागला आहे. एका डिजीटल मोहीमेच्या माध्यमातून जास्तीक जास्त लोकांपर्यंत पोहचून दहा लाख लोकांकडून शुभेच्छांचे व्हिडीओ मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

#HappyBirthdayModiji या हॅशटॅगचा वापर करुन हे व्हिडीओ प्रसारित होणार आहेत. शुभेच्छाच नव्हे तर त्यांच्या नेतृत्वामुळे भारतात कसा आमुलाग्र बदल झाला आहे, त्यांच्या नेतृत्वामुळे देशात कसे आशादायी आणि सकारात्मक बदल झाले आहेत याबद्दलही लोकांना बोलण्यासाठी सांगितले जात आहे. यामुळे हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे.