महाराष्ट्रराजकारण

भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

अनेक दिवसांपासून भाजप नेते एकनाथ खडसे पक्षात नाराज आहेत. ते भाजप नेतृत्वावर टीका करत आहेत. येत्या काळात त्यांच्या एका निर्णयामुळं राजकीय पटलावर मोठं वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून नाराज असणाऱ्ये खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होणार असून, त्याबाबतचा निर्णयही होणार असल्याचं म्हटलं जात आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादीची कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी खडसेंपुढे प्रस्ताव मांडणं हे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं फायद्याचं ठरु शकतं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.

काही दिवसांपासून भाजप आणि खडसे या समीकरणात मीठाचा खडा पडला आहे. किंबहुना खुद्द खडसे यांनी कित्येकदा आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाराजीचा सुर आळवल्याचंही पाहायला मिळालं आहे.