कृषीमहाराष्ट्र

भाजप सरकारची नवी योजना, शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये?

Newslive मराठी-  शेतकऱ्यांच्या कर्जाला माफी देण्यासह कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर सवलती देण्याचा भाजप सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार रूपये पाठवण्याच्या विचारात आहे. ही रक्कम बियाणे, शेती साहित्यासाठी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची घोषणा २६ जानेवारीला होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षातून दोन वेळेस प्रति एकर ४००० रुपये जमा करण्यात येतील. यासाठी सुमारे २ लाख कोटींची तरतूद करावी लागणार आहे.

ओडीसा सरकारच्या या योजनेवर पीएमओ गांभीर्याने विचार करत आहे. वित्त आणि कृषी मंत्रालयाध्ये या मॉडेलवर सातत्याने चर्चा सुरू आहे. ओडिसामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला दहा हजार रूपये राज्य सरकारकडून टाकले जातात. त्यामुळे ओडीसा सरकारवर वर्षाला १.४ लाख कोटी रूपयांचा बोजा पडतो.