महाराष्ट्रलक्षवेधी

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे- शरद पवार

Newslive मराठी- कर्नाटक, मध्यप्रदेश या ठिकाणी भाजपाने ऑपरेशन लोटस राबवलं. त्याचप्रमाणे भाजपा महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाषणात सांगतात की सरकार पाडण्याचा आमचा विचार नाही. मात्र ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न पडद्याआडून भाजपाकडून केला जातोय असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

एका चैनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला .सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. तीन पक्षांमध्ये थोडेफार मतभेद जरुर आहेत. मात्र भाजपाविरोधात आम्ही तिन्ही पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत. आमच्या सरकारला काहीही धोका नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं.

आत्तापर्यंत मी मे महिन्यात हे सरकार पाडलं जाईल असं ऐकलं होतं. त्यानंतर जुलै महिन्याची मुदत देण्यात आली. आता ऑक्टोबरची मुदत दिली जाते आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही. आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी हरकत नाही- शरद पवार

-व्याघ्र दिन एका दिवसापुरता मर्यादीत राहता कमा नये– मुख्यमंत्री