महाराष्ट्रराजकारण

कोरोनामुक्त झाल्याने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळण

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले आहे. पावसाळी अधिवेशन दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये ते पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर ते पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.

पडळकर कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी गुलाब फुलांचा वर्षाव करत त्यांचे अभिनंदन केले. चक्क जेसीबीच्या सहाय्याने आमदार पडळकर यांच्यावर फुलांनी उधळण करत घोषणा देखील दिल्या.

त्यांच्या स्वागतासाठी 100 हून अधिक पोती फुलांचा वापर केला. रुग्णालयाच्या वतीनेही त्यांना पुष्पगु्च्छ देवून त्यांचा सत्कार कऱण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अनेक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी जमले होते.