कृषी महाराष्ट्र

भाजप खासदारानं दिली कांदा निर्यात बंदीबाबत दिलासादायक माहिती

केंद्र सरकारनं कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटला आहे. निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकारी आक्रमक झाला आहे. यावर लवकरच तोडगा निघणार असून केंद्र सरकारच्या वतीने कांद्यावर लावण्यात आलेली बंदी लवकरच उठवण्यात येईल.

कांदा प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. यासंदर्भात भामरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कांद्याचे भाव कोसळत असल्याने उत्तर महाराष्ट्र भागातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे निर्यातबंदीच्या निर्णयाचा पूनर्विचार व्हावा व निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, या मागणीनं जोर धरला आहे. दुसरीकडे, रयत क्रांती संघटना अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वात कांद्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *