महाराष्ट्रराजकारण

भाजपच्या लोकांनी माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला- तुकाराम मुंढे

नागपूरहून तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथे सचिवपदी बदली करण्यात आली आहे. नागपुरात माझ्याविरोधात काही मिळेना म्हणून माझ्या चारित्र्याहिनाचे प्रकार घडवण्यात आले. महिलांना माझ्याकडे आणून कपडे फाडण्याचे प्रकार घडवले गेले, असा धक्कादायक खुलासा तुकाराम मुंढे यांनी केला आहे.

मला ठरवून टार्गेट केले जात होते. माझे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. असे सगळे कोण करणार? ही भाजपचीच लोक होती? दुसरे कोण करणार? असा सवालही यावेळी तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला. तुकाराम मुंढे हे त्यांच्या चोख कामांमुळे आणि तत्त्वांमुळे कायमच चर्चेत राहिलेले आहेत. ही त्यांची पहिली बदली नाही. या बदलीनंतर एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीमध्ये तुकाराम मुंढे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

गेल्या काही वर्षात मी माझा आक्रमकपण कमी केला. माझ्या स्वभावाला मुरड घातली पण यापुढे माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी माझ्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही, असे म्हणत आपल्या मताशी ठाम राहणार असल्याचे मुंढे म्हणाले आहेत. इतकंच नाही तर, मी माझ्या तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्याच पाठीत मीच खंजिर खुपसल्यासारखं होईल, असे म्हणत मुंढे यांनी आपल्या कामाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगितले आहे.