महाराष्ट्रराजकारण

भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता, अनेक बडे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात

राज्यात राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंगला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भरती सुरूच आहे. यानंतर आता भाजपचे अनेक नेते हे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सत्ता गमावल्यानंतर आता भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रामधील भाजप नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे याच भागातून पक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे. यासंबंधी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यासह उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी आमदारांची बैठक सुरू आहे. इतर पक्षातील विशेषत भाजपातील काही नेते यांना राष्ट्रवादी पक्षप्रवेश द्यायचा का याबाबत खलबत सुरू असल्याची चर्चा आहे.

सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.