बातमीमहाराष्ट्रराजकारण

दूध दराच्या श्रेयासाठी भाजपचे आंदोलन -रोहित पवार

Newslive मराठी-  दूध दराच्या प्रश्नावर भाजप राजकारण करत आहे. हा प्रश्न लवकरच सोडवला जातोय, त्यासाठी दोनतीन बैठका झाल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी आंदोलन जाहीर केले. भाजपने राज्य सरकारची काळजी करू नये. केंद्र सरकारने राज्यामध्ये 15 हजार टन दूध पावडर आयात केली, त्याबद्दल भाजप बोलत नाही, इंधन दरवाढीबद्दल शांत आहे. भाजपने याविरोधात आंदोलन करावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले.

सन २०१६ मध्ये जीएसटीचे केंद्र सरकारच्या निर्णयाने 16 हजार कोटींचे नुकसान झाले, त्याबद्दलही भाजप बोलत नाही. जीएसटीचा परतावा दिला म्हणजे केंद्र सरकारने उपकार केले नाहीत. केंद्र सरकार सांगते, की 33 हजार कोटी रुपयांची मदत महाराष्ट्राला दिली, मात्र राज्यातील भाजप 75 हजार कोटी रुपये दिले, असे सांगत आहे. हा निधी जीएसटीच्या सेस फंडातील आहे, तो लोकांचा आहे. भाजपने केवळ सत्य काय आहे ते सांगावे. भाजप राजकारण करत आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.

सरकार स्थापन झाल्यावर एक महिन्यात सरकार कोसळेल असे विरोधक सांगत होते, आता सहा महिने झाले आहेत, बोलताबोलता पाच वर्षे कधी पूर्ण होतील, हे भाजपाला समजणारही नाही. सध्या कोरोना नियंत्रणच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अर्थकारण रुळावर आणून आरोग्यही जपायचे आहे, असे रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-दूध उत्पादकांसाठीचे भाजपचे आजचे आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे- राजू शेट्टी

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले– राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi