महाराष्ट्रराजकारण

आजचा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल; काँग्रेसची मोदींवर जोरदार टीका

शेती विषयक विधायकमुळे सध्या दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. राज्यसभेत सरकारने शेतीशी संबंधित तीन विधेयके सादर केली. त्यामुळे विरोधकांनी सदनात गोंधळ घातला. विरोधकांचा गदारोळ सुरू असताना आवाजी मतदानाने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, तसेच हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक संमत झाली. यावेळी मोठा गोंधळ बघायला मिळाला.

विधेयकांना मंजुरी देण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष राज्यसभा उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचं काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांनी सांगितलं आहे. आजचा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल, असं अहमद पटेल यांनी म्हटलं आहे.

उपसभापतींनी लोकशाहीच्या परंपरेचे रक्षण करायला हवं. मात्र या ऐवजी त्यांच्या वागणुकीमुळे आज लोकशाही परंपरा आणि प्रक्रियेस नुकसान पोहचवलं आहे, असं अहमद पटेल यांनी म्हटलं आहे. ज्या प्रकारे ही विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. ते लोकाशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे. तसेच राहुल गांधी यांनी देखील मोदींवर ट्विटरद्वारे टीका केली आहे.