आंतरराष्ट्रीय लक्षवेधी

पलकने तयार केला भय्यू महाराजांचा अश्लील व्हिडिओ

Newslive मराठी-  आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्यापैकी पलकने त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित युवतीने भय्यू महाराजांवर लग्नासाठी दबाव टाकला होता. लग्न न केल्यास दाती महाराजांप्रमाणे तुमच्यावर गुन्हा दाखल करु अशी धमकी तिने दिली होती.

पलकने लग्नकरण्यासाठी भय्यू महाराजांना एक वर्षाचा अल्टिमेटम दिला होता. त्याची मुदत १६ जूनला संपणार होती. त्याआधीच १२ जून रोजी भय्यू महाराजांनी आत्महत्या केली.

कोण होती पलक

भय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर पलक केअर टेकर म्हणून आली होती. महाराजांच्या एकटेपणाचा फायदा घेत तिने प्रेम संबंध निर्माण केले. तिनेच महाराजांचा अश्लील व्हिडिओ तयार केला. इतक नव्हे तर वॉट्सएपवर अश्लील चॅटकरुन ते सेव्ह करायची. यात महाराजांनी १७ एप्रिल २०१७ रोजी आयुषी यांच्याशी विवाह केला. याची माहिती कळताच पलकने लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. महाराजांनी लग्नासाठी नकार दिला. त्यावर, मी तुम्हाला लग्न करण्यासाठी एक वर्षाचा मुदत देते अशी धमकी तिने दिली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *