कोरोनामहाराष्ट्र

राज्यांतर्गत प्रवासासाठी उद्यापासून बुकिंग सुरू, रेल्वेचा मोठा निर्णय  

कोरोनामुळे देशात सर्व काही ठप्प आहे. सध्या मात्र राज्यभरात हळूहळू लॉकडाऊन शिथिल होत आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून देशभरात सुरू असेलला कोरोनाचा कहर सुरूच आहे. या काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र अनलॉकमध्ये हळूहळू या सेवा पूर्ववत केल्या जात आहे. यामध्ये नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत.

सध्या देशात Unlock -4 ची सुरुवात झाली असून यादरम्यान अनेक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान काल राज्यात प्रवासासाठी ई-पासची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर दुसरीकडे मध्ये रेल्वेनेही राज्यांतर्गंत प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्या 2 सप्टेंबरपासून सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर रेल्वेने प्रवास होतो. मात्र कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वे ठप्प झाली आहे. आता रेल्वेचे बुकिंग सुरू होणार आहे. यामुळे ही एक दिलासादायक बाब आहे.