बारामतीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन फोटो सोशल मीडियावर प्रसारीत

Newslive मराठी- बारामतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन विनयभंग केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील झारगडवाडी-पिंपळी गावांदरम्यान घडला.

अपहरण केलेल्या मुलीचे फोटो सोशल मीडीयावर प्रसारीत करण्यात आले, या प्रकरणी पोलिसांनी चौघा युवकांविरोधात अपहरण, विनयभंग, बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.